पुणे

भोरमधील स्वयंपाकी, मदतनिसांचे वेतन रखडले

CD

हिर्डोशी, ता. २८ : भोर तालुक्यातील स्वयंपाकी व मदतनीसांच्या राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या
वतीने शनिवारी (ता. २८) भोरमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मानधनात वाढ करून थकीत मानधन तातडीने मिळावे आदी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनिसांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन रखडले आहे. मुळातच तुटपुंज्या मानधनात काम करूनही मानधन वेळेवर मिळत नाही. अधिवेशन काळात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीला संघटनेचे सचिव विठ्ठल करंजे, तालुका अध्यक्षा मनीषा भैरवकर, रंजना तावरे, सीमा धुमाळ, मनिषा शेडगे, शिल्पा सणस, भारती धुमाळ, सीमा शिळीमकर, मंदा पारठे आदी तालुक्यातील स्वयंपाकी व मदतनीस हजर होत्या.
भोर तालुक्यात ४७८ स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना २५०० रुपये प्रतिमहा मानधन देण्यात येते. आहार शिजवणे, तांदूळ आणि धान्य आदी मालाची साफसफाई, आहाराचे वाटप, जेवणाच्या जागा, ताटे आणि स्वयंपाकगृहाची साफसफाई, सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट, पिण्याचे पाणी भरणे, भाजीपाल्याची नोंद ठेवणे आदी कामे स्वयंपाकी आणि मदतनिसांना करावी लागत आहेत. या सर्व कामात बराच वेळ लागत असल्यामुळे मिळणारे २५०० रुपये मानधन तुटपुंजे आहे. त्यामुळे वाढीव मानधन मिळावे यांसह शासकीय सेवेत कायम करणे, वेळेवर आणि बारमाही मानधन मिळावे आदी संघटनेच्या मागण्या असल्याचे करंजे यांनी सांगितले.

03185

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT