पुणे

किल्ले रायरेश्वरवर शिवभक्तीचा निनाद

CD

हिर्डोशी, ता. २१ : किल्ले रायरेश्वर (ता. भोर) येथील पठारावरील मंदिर आणि परिसरात तिथीनुसार ३८१ वा हिंदवी स्वराज्य शपथ दिन विविध उपक्रमातून बुधवारी (ता. २५) साजरा करण्यात आला.
शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक, दुग्धाभिषेक, गड आणि ध्वज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवपालखी मिरवणूक व फलटणच्या संस्कृती प्रतिष्ठान ढोल-ताशा व ध्वज पथक वाद्यांनी पठार दणाणून गेले.‌ शुभम दिघे, वरद कोळपकर, उर्वशी वैजवाडे आरेखित जननी माता मंदिर व हिंदवी स्वराज्य स्तंभ आरेखन चित्रांचे तसेच डॉ. सचिन पुणेकर लिखित हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. चंद्रकांत शहासने संग्रहित २००० क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शिववंदना देण्यात आली. शिवकार्यात योगदान देणाऱ्या संस्थांचा, सरदार घराण्यांतील वंशजांचा सन्मान ग्रामस्थांकडून करण्यात आला.
रायरेश्वर भूमीचा समग्र शाश्वत विकास, केंद्र व राज्य सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेत व स्वराज्य सर्किटमध्ये रायरेश्वरचा समावेश, हिंदवी स्वराज्य स्तंभाच्या उभारणीबाबतची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच हा कुंभमेळा शासकीय, लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. मोहन वामन, डॉ. सचिन पुणेकर, युवराज जेधे, मारुती गोळे, दत्तात्रेय जंगम, मौनीबाबा महाराज, ग्रामस्थ व वन विभागाचे योगदान लाभले.
श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, बायोस्फिअर्स संस्था, ग्रामपंचायत रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती व सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून उपक्रमांचे आयोजन केले. प्रस्तावना डॉ. सचिन पुणेकर, सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT