हिर्डोशी, ता.३१: शेतात काम करत असताना झालेल्या जोरदार पाऊस व गारपिटीच्या माराने अस्वस्थ होऊन तब्येत खालावलेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची घटना करंजे (ता.भोर) येथे सोमवारी (ता.३०) सायंकाळी घडली आहे.
राजेंद्र लक्ष्मण कुडले (वय ५४, रा.करंजे) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्रशासनाकडून मंगळवारी (ता.३१) सकाळी पंचनामा करण्यात आला आहे.
कुडले यांनी कलिंगडाची शेती केली आहे. सध्या कलिंगडाची मागणी असल्याने ते दुपारी कुटुंबासह शेतात कलिंगडे तोडणी करत होते. दरम्यान, सोमवारी (ता .३०) दुपारी अचानक झालेल्या गारांच्या पावसात ते पूर्ण भिजले. गारांच्या माराने त्यांची तब्येत अचानक खालवली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. याबाबत त्यांचे बंधू विजय कुडले व मुलगा स्वामी कुडले यांनी प्रशासनाला जबाब दिला आहे. प्रशासनाकडून ग्राम महसूल अधिकारी प्रमोद बोरचाटे, ग्रामपंचायत अधिकारी विशाल अनंतकर यांनी पंचनामा केला.
दरम्यान, प्रशासनाकडून कुटुंबाला तातडीची मदत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
03334
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.