पुणे

नारायणगाव येथे महामार्गावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार

CD

नारायणगाव, ता. १८ : येथील पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहनाची धडक बसून कोल्हा या वन्य प्राण्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहा वाजण्याचा सुमारास शॅम्पेन कंपनी जवळ घडली.
मागील चार दिवसांत भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक बसून दोन कोल्हे मृत झाले आहेत. दोन्ही घटना दिवसा झाल्या आहेत. वाहनांचा वेग नियंत्रित असता तर या दोन वन्य प्राण्यांचा बळी गेला नसता, अशी माहिती वनपाल अनिता होले यांनी दिली.
चौदा जानेवारी रोजीसुद्धा याच भागात भरधाव जाणाऱ्या वाहनाची धडक बसून कोल्हा मृत्युमुखी पडला होता. मागील वर्षभरामध्ये या भागात महामार्गावर झालेल्या अपघातात वाहनांची धडक बसून कोल्हा, तरस व पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर वाहनाची धडक बसून वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, वन्य प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व वन विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याबाबत वन्यप्रेमी चंद्रशेखर भागवत, हनुमंतराव भापकर यांनी खंत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: गॅस सिलिंडर वेटिंग कमी झाली, तरी नागरिकांची अडचण कायम आहे; युद्धानंतर गॅस पुरवठा विस्कळीत; वेटिंग अजूनही हजारोंमध्ये

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाच्या चटक्याने हवा प्रदूषणातही वाढ ; शहराचा एक्यूआय १४० च्या घरात; संवेदनशील गटांसाठी धोक्याची घंटा

Kairi Poha Recipe: काय? तुम्ही अजून 'कैरी पोहे' ट्राय नाही केले? जाणून घ्या अस्सल कोकणी चवीची सोपी रेसिपी

Chhatrapati Sambhajinagar: खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर नको; पाण्याच्या मीटरचा ५१४ कोटींचा नव्याने प्रस्ताव

Trimbakeshwar VIP Darshan Scam: त्र्यंबकेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त कडलगला अटक

SCROLL FOR NEXT