पुणे

वडगाव कांदळी येथे तरुणीची आत्महत्या

CD

नारायणगाव, ता. ७ : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील अर्चना लक्ष्मण करगळ (वय १८, मूळ रा. गाजीपूर-ढवळपुरी, ता. पारनेर, जि. नगर) या तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील लक्ष्मण करगळ हे मेंढपाळ असून, सध्या वडगाव कांदळी येथे स्थायिक आहेत. त्यांची मुलगी अर्चना ही सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली. मुलीला बिबट्याने नेले असल्याचा संशय आल्याने याबाबतची माहिती त्यांनी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांना दिली. त्यानंतर नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार, वनरक्षक पवार, अपाद मित्र भुजबळ घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी अर्चना हीचा शोध परिसरात घेतला, मात्र ती आढळून आली नाही. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वडगाव कांदळी येथील विहिरीजवळ अर्चना हिची चप्पल व ओढणी आढळून आली. विहिरीत अर्चना हिचा मृतदेह आढळून आला. जुन्नर येथील रेस्क्यू टीमचे सदस्य, पोलिस अधिकारी, कर्मचारी, वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून रात्री उशिरा काढण्यात यश आले.
अर्चना ही बारावी उत्तीर्ण झाली होती. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT