पुणे

वारुळवाडीचे सरपंच मेहेर यांचा अविश्‍वासाआधीच राजीनामा

CD

नारायणगाव, ता. १२ : वारुळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी आज सरपंच पदाचा राजीनामा तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला आहे. अविश्‍वासाच्या ठरावावर मतदान घेण्यापूर्वीच मेहेर यांनी राजीनामा दिल्याने चर्चा सुरू झाली आहे.
९ फेब्रुवारी २०२१ला मेहेर यांची वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. मागील चार वर्षे ते सरपंचपदावर होते. या माध्यमातून वारुळवाडी परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. ११ मार्च २०२५ला १७ पैकी १४ सदस्यांनी सरपंच मेहेर यांच्याविरोधात तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्याकडे अविश्‍वासाचा ठराव दाखल केला होता. अविश्‍वासाच्या ठरावावर मतदान घेण्यासाठी सोमवारी (ता. १७) वारुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी तीन वाजता सदस्यांची बैठक घेण्यात येणार होती. अविश्‍वासाच्या ठरावावर मतदान होणार असल्याने सदस्यांचा भाव वाढला होता. फाटाफूट टाळण्यासाठी सरपंचपदासाठी इच्छुक असलेले विनायक भुजबळ, माजी सरपंच जंगल कोल्हे, देवेंद्र बनकर यांच्यासह १४ सदस्य आज सकाळीच सहलीसाठी रवाना झाले. हे सदस्य सोमवारीदुपारी तीन वाजता अविश्‍वासाच्या ठरावावर मतदानासाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहणार होते. मात्र त्यापूर्वीच बुधवारी (ता. १२) दुपारी राजेंद्र मेहेर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. आता या राजीनाम्याची पडताळणी करून राजीनामा मंजूर प्रक्रिया १७ मार्चपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

Yavatmal Accident: बारा फूट खड्ड्यात बैलबंडी कोसळली; दोन शेतकरी गंभीर, बैल ठार, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणा आला समोर!

बोलेरो पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात; ८ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Danoli Village Bandh : माणुसकीचा हुंकार! दानोळीत सामाजिक एकोप्याचा स्वर; भरतेशच्या निधनामुळे बौद्ध समाजाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT