पुणे

चुकीच्या प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढा

CD

नारायणगाव, ता. २४ : ‘‘पोलिस शासन व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था आहे. चुकीच्या प्रवृत्तींना डोके वर काढून देऊ नका. या प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढा. पोलिसांच्या कामगिरीत राजकीय हस्तक्षेप नको. पोलिस दलाचा लौकिक वाढेल असे चांगले काम करा. पोलिस जनतेशी कसे वागतात, कसे प्रश्न कसे सोडवतात. यावर पोलिस दलाबरोबरच सरकारची प्रतिमा तयार होत असते. पोलिस दलाचा कारभार महायुती सरकारची प्रतिमा उंचावणारा असावा,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेला दिले.

शासनाच्या वतीने पाच कोटी साठ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या नारायणगाव पोलिस ठाण्याच्या अद्ययावत इमारतीचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.२४) सकाळी नऊ वाजता झाले. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अतुल बेनके, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, रमेश चोपडे, गोविंद शिंदे, रवींद्र चौधर, भाजप नेत्या आशा बुचके, गुलाबराव नेहरकर, गणपतराव फुलवडे, पांडुरंग पवार, माऊली खंडागळे, संतोष खैरे, वारुळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ, श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, प्रियंका शेळके, उज्वला शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले. सूत्रसंचालन अभय वारूळे यांनी केले.

अजित पवार म्हणाले...
१. राज्यात ७७ हजार कोटी रुपयांचा सायबर क्राईम झाला आहे.
२. विकास कामांसाठी ३६ जिल्ह्यातील डीपीसीला २१ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला .
३. ६०० कोटी रुपये पोलिस दलाच्या सुसज्यतेसाठी दिले आहेत.
४. निधीचा वापर सायबर क्राईमचा छडा लावण्यासाठी, अँटी-ड्रोन गन, सीसीटीव्ही कॅमेरे आदीसाठी
५. पुणे जिल्ह्यातील पोलिस दलासाठी डीपीसीला ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
६. वीज टंचाई दूर करण्यासाठी ९ हजार ५०० मेगावॅट वीज निर्मितीसाठीसोलर प्रकल्प हातात घेतले आहेत.
७. कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
८. शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबांना एक कोटी रुपयांची मदत करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विधानसभा व लोकसभा सदस्यांच्या जागेत सन २०२९मध्ये वाढ होणार आहे. यामुळे माझ्या ९६ लाडक्या भगिनींना (महिलांना) राज्याच्या विधानसभेत संधी मिळणार आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

जुन्नर तालुक्यातील ओतूर, जुन्नर, आळेफाटा या पोलिस ठाण्यांना जोडणारे नारायणगाव हे पुणे नाशिक महामार्गावरील महत्त्वाचे पोलिस ठाणे आहे. या ठिकाणी साडेतीन एकर जागा उपलब्ध आहे.या जागेत दहा पोलिस अधिकारी व शंभर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
- संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक

06646

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT