पुणे

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शास्त्रज्ञ, अधिकारी करणार मार्गदर्शन

CD

नारायणगाव, ता. २९: केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पनेतून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान ''विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविले जाणार आहे. ''अनुसंधान किसान के द्वार'' या संकल्पनेवर आधारित या महत्वाकांक्षी अभियानात खरीप हंगामातील नियोजन, पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, कृषीच्या विविध योजना आदींबाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शास्त्रज्ञ, अधिकारी, प्रयोगशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत,अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली.
कृषी संबंधित विविध विभागांच्या यंत्रणांच्या सहभागाने व समन्वित प्रयत्नांनी हे अभियान पार पाडण्यात येणार आहे. या अभियानात पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक १८० गावात विकसित कृषी संकल्प अभियानाचा रथ पोचणार आहे. या अभियानाचा शुभारंभ आज येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आला.

१२ जून २०२५ पर्यंत असणाऱ्या अभियानासाठी शास्त्रज्ञांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात भारतीय कृषी अनुसंधान परिषद द्राक्ष संशोधन केंद्र, पुष्प संशोधन केंद्र, कांदा व लसूण संशोधन केंद्र, पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील केव्हीकेचे शास्त्रज्ञ, आत्मा, कृषी विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या अभियानादरम्यान तत्सम गावांमधील प्रगतशील,उद्यमशील व प्रयोगशील शेतकऱ्यांना निमंत्रित केले आहे. या अभियानासाठी पाच गावांच्या समूहातील एका गावात कृषी विषयक कार्यक्रम होईल.
-अनिल मेहेर, अध्यक्ष : कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
अभियानात शेतकरी, शेतकरी गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा सहभाग होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, गरजा तसेच नावीन्यपूर्ण संशोधन संदर्भात शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील. यावेळी कृषी विषयक प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. या विकसित कृषी संकल्प अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. अधिक माहिती संपर्कसाठी अभियानाचे नोडल अधिकारी तथा कृषी विस्तार विषयतज्ज्ञ राहुल घाडगे (९४२२०८००११ ) यांच्याशी संपर्क साधावा.

06661

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT