पुणे

लाला अर्बन सहकारी बँकेस उत्कृष्ट नागरी बॅंक पुरस्कार

CD

नारायणगाव, ता. ३१ : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील लाला अर्बन सहकारी बँकेस सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षामध्ये उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार जाहीर केला आहे. उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेत पुणे विभागामधून ५०० कोटीपर्यंतच्या ठेवी असलेल्या बँकांतून लाला बँकेची निवड केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी दिली.
लाला बँकेच्या संचालकांची बैठक अध्यक्ष युवराज बाणखेले यांच्या उपस्थितीत बँकेच्या नारायणगाव येथील मुख्य कार्यालयात झाली. यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सी. ए. जैनुद्दीन मुल्ला, ज्येष्ठ संचालक ॲड. निवृत्ती काळे, रामदास बाणखेले, अशोक गांधी, नितीन लोणारी, मंगेश बाणखेले, नारायण गाढवे, जयसिंग थोरात, संदीप लेंडे, डॉ. सचिन कांबळे, सुनीता साकोरे, इंदुमती कवडे, बाळासाहेब शिंदे, भानुदास टेंगले, तज्ञ संचालक किरण कर्नाड, ॲड. शंकर शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. सुरम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, कर्ज अधिकारी प्रमोद कांबळे, वसुली अधिकारी संतोष पटाडे, गुंतवणुक अधिकारी मनोहर गभाले आदि उपस्थित होते.
अध्यक्ष बाणखेले म्हणाले, ‘‘दिवंगत माजी खासदार किसनराव बाणखेले यांनी स्थापन केलेल्या लाला बँकेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ४५ कोटी रुपयांची, तर कर्ज वाटपात ४६ कोटी रुपयांची वाढ केली आहे. बँकेचा सीआरएआर १४.०६ टक्के असून, नेट एनपीएचे प्रमाण ० टक्के आहे. बँकेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. या आर्थिक निकषावर हा पुरस्कार लाला बँकेस जाहीर झाला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

Dahi Handi: दहीहंडी उत्सवावर पोलिसांचे विशेष लक्ष, शहरात कडेकोट बंदोबस्त; कशी असेल सुरक्षा?

Raigad News: चिंता मिटली, धरणे भरली! रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये 95 टक्के जलसाठा

Latest Marathi News Live Updates: UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं

SCROLL FOR NEXT