पुणे

मीना नदी काठावर कचऱ्याचे ढीग

CD

नारायणगाव, ता. १८ : येथील पुणे- नाशिक महामार्गावर असलेल्या मीना नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या दोन्ही बाजूला व मीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये बांधलेला कचरा, हॉटेलमधील शिल्लक अन्नपदार्थ, मृत कोंबड्यांचे अवयव, पिसे टाकण्यात आली आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारावरच हे ओंगळवाणे दृश्य दिसत आहे. नागरिकांच्या सहकार्याअभावी या भागात पडलेला प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेला कचरा पाहता नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायतीने जाहीर केलेली प्लॅस्टिक बंदी व मीना नदी स्वच्छता अभियान कागदावरच दिसून येत आहे. मागील काही वर्षात नारायणगाव, वारूळवाडी ग्रामपंचायत परिसराचे शहरीकरण झाले आहे. मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या, हॉस्पिटल, हॉटेल, लॉज झाले आहेत. लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम प्रामुख्याने सांडपाणी, पिण्याचे पाणी व कचऱ्याची विल्हेवाट या नागरी सुविधांवर पडत आहे.
नारायणगाव ग्रामपंचायतच्या पुढाकारातून मीना नदी स्वच्छता अभियानाचा संकल्प पाच वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. त्या माध्यमातून प्रदूषण टाळण्यासाठी सांडपाण्याचे एकत्रीकरण, गॅस शवदाहिनी, सांडपाण्यात ईव्हीएम द्रावणाचा वापर, कचरा जमा करण्यासाठी अतिरिक्त वाहनांचा वापर आदी उपाययोजना केल्या आहेत. मात्र, सद्यःस्थिती पाहता हॉटेल व्यावसायिक, नागरिक यांच्याकडून कचरा विल्हेवाट लावण्यासंदर्भात नियमांचे पालन केले जात नाही. प्लॅस्टिक बंदी असताना सुद्धा नारायणगाव, वारूळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक विक्रीचा व्यवसाय सुरू असून, व्यावसायिक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून रात्रीच्या वेळेला मीना नदीच्या काठावर व मीना नदी परिसरात टाकला जात आहे. ग्रामपंचायतीने कृपया येथे कचरा टाकू नये अन्यथा, आपला फोटो बस स्थानकावर लावला जाईल, अशा आशयाचा सूचना फलक येथील पुणे- नाशिक महामार्गालगत मीना नदीच्या काठावर लावला आहे. तरीसुद्धा या सूचना फलकाच्या जवळ व मीना नदी पात्रात प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरलेल्या कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे.

कचरा जमा करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीसह पाच वाहने सकाळ व सायंकाळी ग्रामपंचायत हद्दीत फिरत असतात. मात्र, सदनिकांमध्ये राहणारे सुशिक्षित नागरिक, नोकरदार, हॉटेल व्यावसायिक आपल्या सोयीनुसार प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा भरून मीना नदी पात्रात व काठावर टाकत आहेत. यापुढे कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
-योगेश पाटे, उपसरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Latest Marathi News Live Updates : छत्रपती संभाजी नगर तालुक्यात ढगफुटी

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

SCROLL FOR NEXT