पुणे

जुन्नरमध्ये संततधार पावसामुळे पेरणी खोळंबली

CD

नारायणगाव, ता.१: जुन्नर तालुक्यात खरीप पिकाखाली ५८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ६० टक्के (सुमारे ३६ हजार हेक्टर) क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. मागील पाच ते सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्यात खरीप पिकांची शिल्लक पेरणीची व शेतीच्या आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात सततच्या पावसामुळे फळ भाजीपाला पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कृषी विभागाने खरीप हंगामातील पिकांचे नियोजन केले आहे. तालुक्यात मे महिन्यात सरासरी १९० मिलिमीटर तर जून महिन्यात सरासरी १४८ मिलिमीटर
असा एकूण सरासरी ३३८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यावर्षी जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्याने सुरुवातीच्या काळात खरीप पिकांच्या पेरणीच्या कामांनी वेग घेतला होता. ६० टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी वेळेत व समाधानकारक पाऊस झाल्याने शंभर टक्के खरिपाची पेरणी होईल. असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
तालुक्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे. मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकाची नऊ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून उतार समाधानकारक आहे. अकरा हजार हेक्टर पैकी नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील भात रोपांच्या पुनरलागवडीची कामे पूर्ण झाली आहेत. पेरणी झालेल्या सोयाबीन, भुईमूग, तेलबिया, कडधान्य, मका बियाणांचा उतार चांगला झाला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने तन काढणे,पिकाला भराव देणे, खतांचा ढोस देणे, फवारणी करणे आदी पिकांच्या अंतर मशागतीची व शिल्लक खरीप पिकांच्या पेरणीची कामे लांबली आहेत.

जून महिन्यात सर्वाधिक २२५ मिलिमीटर पाऊस पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात झाला आहे. यामुळे पिंपळगाव जोगे धरणात ४.४९५ टीएमसी मृत पाणी साठ्याची पातळी पूर्ण होऊन उपयुक्त पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे. आज अखेर कुकडी प्रकल्पात ८.५२२ टीएमसी(२८.७२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सहाशे टन युरिया खताचा बफर स्टॉक (राखीव साठा) आहे. शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर १२५ क्विंटल फुले किमया ७५३ या जातीचे सोयाबीन व १०२ क्विंटल भुईमूग बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, युरिया ब्रिकेटचा वापर, चार सूत्री भात लागवड, खते व बियाणे बचत या बाबत मार्गदर्शन केले आहे.
- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT