पुणे

मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करावा

CD

नारायणगाव, ता. २६ : ‘‘पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून
समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव सुरक्षित व मंगलमय वातावरणात साजरा करावा. अपघात टाळण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेतच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जन मिरवणूक ग्रामीण भागात सूर्यास्तापूर्वी, तर शहरी भागात रात्री बारापूर्वी संपवावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिस ठाण्याची पूर्वपरवानगी घ्यावी. प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. डीजेचा वापर करू नये,’’ असे आवाहन नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ गावांतील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल यांची संयुक्त बैठक पोलिस ठाण्याच्या सभागृहात सोमवारी (ता. २५) घेण्यात आली. त्यावेळी शेलार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. स्वयंसेवकांना मंडळाचे ओळखपत्र द्यावे, मोठ्या मंडळांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रवेश, निर्गमन मार्ग व्यवस्था करावी. मंडपात एकाच वेळी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांशी समन्वय साधून वाहतूक व्यवस्थेची पूर्वतयारी करावी. प्रतिष्ठापना व विसर्जन काळात मिरवणूक काढताना, हाताळताना गणेश मूर्तीची काळजी घ्यावी. विसर्जनासाठी सरकारी व अधिकृत विसर्जनस्थळाचा वापर करावा. डीजे अथवा इतर ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरताना निर्धारित डेसिबलची मर्यादा पाळावी. रात्री दहानंतर ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद ठेवावी. मिरवणुकीसाठी पोलिस पूर्वपरवाना घ्यावा. धार्मिक भावना दुखावणारे, इतर जाती-धर्मांना लक्ष्य करणारे फलक, भाषणे, नारेबाजी टाळावी. जुगार, मद्यपान, अश्लील नाचगाणी अशा कोणत्याही अवैध प्रकारांना मंडपात किंवा परिसरात परवानगी देऊ नये.’’

नारायणगाव- वारूळवाडी परिसरात सुमारे साठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन घाटात गणेश मूर्तीचे संकलन व निर्माल्य जमा करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. नदीपात्राचे प्रदूषण टाळण्यासाठी ईएम द्रावणाचा उपयोग केला जाईल. ते प्रत्येक मंडळाला भेट देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने उभारलेल्या स्टॉलवर गणेश मूर्ती दान कराव्यात.
- योगेश पाटे, उपसरपंच, नारायणगाव (ता. जुन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात वाहतूक बदल; अनेक मार्ग बंद, पाहा पर्यायी मार्ग कोणते?

Ganesh Chaturthi 2025 Marathi Wishes: आला आला माझा गणराज आला...! गणेश चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा मराठीतून भक्तीमय शुभेच्छा

Latest Maharashtra News Updates: पीएमपी चालकाला ह्रदयविकाराचा झटका, लक्ष्मी रस्त्यावरील घटना

लता मंगेशकर यांनी बाथरुममध्ये रेकॉर्ड केलं 'मुगल-ए-आजम'सिनेमातील 'हे' गाणं, 105 वेळा झाला गाण्यात बदल

Ganesh Chaturthi 2025 : मोदकासाठी तांदूळ दळायचे विसरले, टेंशन नका घेऊ, तांदूळ भिजवून करा उकडीचे मोदक

SCROLL FOR NEXT