पुणे

नाशिक महामार्गावर सीएनजी गॅसची गळती

CD

नारायणगाव, ता. २० : पुणे-नाशिक महामार्गावर सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातून नारायणगाव (ता. जुन्नर) येथे सीएनजी गॅसची गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. महामार्ग परिसरात गॅसचे थर जमा झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. ही घटना शनिवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता घडली. गॅसची गळती झाल्यामुळे पंप मालकाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आळेफाटा (ता. जुन्नर) येथील जनसेवा पंपाला खेड येथून सीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. सीएनजी गॅसचे किट घेऊन टेम्पो पुणे-नाशिक महामार्गावरून आळेफाटा येथे निघाला होता. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील वालझडे मळा येथे मेनलाइनचा पाइप फुटल्याने सीएनजी गॅसची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. चालकाने महामार्गावरच वाहन उभे केले. ज्वालाग्राही असलेल्या गॅसबाबत शास्त्रीय माहिती नसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे महामार्गावरून ये-जा करणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली. दरम्यान घटनास्थळी नारायणगावचे पोलिस कॉन्स्टेबल अमोल मिडगुले, मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ सव्वानऊच्या सुमारास दाखल झाले. वाहन चालक व मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ यांनी किटमधील खालच्या थरातील सीएनजी सिलिंडरचे व्हॉल्व्ह बंद केले. त्यानंतर सीएनजीची गळती थांबली. दरम्यानच्या काळात वरच्या थरातील १० ते १० सिलिंडरमधील गॅसची गळती झाली होती.

वाहनातील सिलिंडरच्या किटमध्ये सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ७५० किलो सीएनजी गॅस बसतो. सीएनजी गॅस हवेच्या सानिध्यात आल्यानंतर त्याचे पाणी होत असल्याने गळती नंतर घरगुती गॅस (एलपीजी) प्रमाणे आग लागण्याचा धोका नसतो.
- बाळासाहेब बढे, बढे सर्व्हिस स्टेशन, सीएनजी पंप मालक, कांदळी (ता. जुन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul price cut News : ‘अमूल’ने घेतला मोठा निर्णय! तब्बल ७०० पेक्षा अधिक उत्पादनांच्या किंमतीत केली घट

Dandiya Function : कोल्हापुरात नवरात्रोत्सवात रास दांडिया खेळण्यासाठी जय्यत तयारी, विविध ठिकाणी होणार कार्यक्रम; इथे उत्साह वाढवा

Motala Crime : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये विवाहितेचा विनयभंग; पुण्यावरून येताना घडली घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Smriti Mandhana: स्मृती मानधनाने मोडला Virat Kohli चा मोठा विक्रम! भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंनाही नाही जमला असा पराक्रम केला

Latest Marathi News Live Update : माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT