पुणे

जुन्नरमधील ढगाळ हवामानाने द्राक्ष, आंबा उत्पादक चिंतेत

CD

नारायणगाव, ता.२४: राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. मागील दोन दिवसांपासून जुन्नर तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांसह कांदा, गव्हू, आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
मे व सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यावर्षी तालुक्यातील ७० टक्के द्राक्ष बागांना घड निर्मिती झाली नाही. याचा फटका या वर्षी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. शरद सीडलेस, जम्बो, रेड ग्लोब या जातीच्या काही द्राक्ष बागांना अल्प प्रमाणात घड निर्मिती झाली होती. यापैकी काही बागांची द्राक्ष तोडणी झाली असून, काही बागेतील द्राक्ष परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. कांदा, गव्हू ही पिके सुद्धा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील येणेरे, कुसूर, वडज, आपटाळे भागात आंब्याच्या बागा आहेत. या आंब्यांना वाटाण्याच्या आकाराच्या कैऱ्या लगडल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून, कैऱ्यांची गळ वाढणार आहे. पाऊस झाल्यास द्राक्ष, कांदा, गव्हू, आंबा या पिकांचे नुकसान होणार आहे. परिपक्व होण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष, कांदा, गव्हू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.

07920

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT