नारायणगाव, ता.३ : वारूळवाडीत (ता. जुन्नर) सोमवारी (ता. २) पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संतोष अडसरे यांचा गोंड्या नावाचा पाळीव कुत्रा ठार झाला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
घटनेनंतर उसाच्या शेतात बिबट्या असल्याचे निदर्शनास आल्याने जुन्नर वनविभागाच्या वतीने तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली. दरम्यान, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तुकाराम निंबारकर हे येथील शेतात शेळ्या व मेंढ्या चारत असताना बिबट्याने कळपावर झडप टाकून सहा महिन्याचे बकरू उचलून नेले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात वनविभागाच्या वतीने दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंजऱ्यामध्ये भक्ष म्हणून कोंबडी ठेवली आहे, अशी माहिती मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ यांनी दिली.
07942
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.