पुणे

निर्यातक्षम जम्बो द्राक्षाला उच्चांकी बाजारभाव

CD

रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा 
 नारायणगाव, ता. १५ : जुन्नर तालुक्यात उत्पादित होणाऱ्या जंबो द्राक्षांच्या बाजारभावावर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम झाला नाही. देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढल्याने चांगल्या प्रतीच्या निर्यातक्षम जंबो द्राक्षाला दोनशे रुपयांच्या पुढे उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. यामुळे कमी उत्पादनात सुद्धा काही शेतकऱ्यांचा चांगला आर्थिक लाभ झाला. मागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता प्रथमच जंबो द्राक्षाला दोनशे रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे.
जांभळाच्या आकाराची, चवीला गोड, खाण्यास कुरकुरीत व आरोग्यवर्धक असलेली प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी उत्पादनात ७० ते ८० टक्के घट झाली आहे. तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सद्यःस्थितीत काही शेतकऱ्यांकडे जंबो द्राक्ष आहेत. वाढलेल्या तापमानामुळे द्राक्षाची गोडी वाढली आहे.

तालुक्यात द्राक्ष लागवडीखाली सुमारे तीन हजार एकर क्षेत्र होते. यापैकी सुमारे दोन हजार एकर क्षेत्र जंबो लागवडीखाली होते. जंबो द्राक्ष जात अतिशय संवेदनशील असते. प्रतिकूल हवामानाचा परिणाम या जातीवर लगेच होतो. यामुळे मागील काही वर्षांपासून उत्पादन घटत असल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी या वर्षी जम्बो द्राक्ष बागा तोडून प्रतिकूल हवामानात तग धरणाऱ्या अमेरिकन जातीची द्राक्ष लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकन जातीची फायदा
- प्रतिकूल परिस्थितीत जम्बो द्राक्षाचे उत्पादन घेण्यात यश
- रमजान सण, मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत असूनही फायदा
- युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्राक्षाची निर्यात ठप्प असताना देखील मागणी


दरम्यान, मागील आठवड्यात जंबो द्राक्षाला प्रतिकिलो १७५ रुपयांपर्यंत बाजारभाव होता. मागील दोन दिवसांत चांगल्या प्रतीच्या जंबो द्राक्षाला प्रतिकिलो दोनशे रुपयांच्या पुढे बाजारभाव मिळत आहे.

१२ टनाच्या विक्रीतून सुमारे २२ लाखांचे उत्पन्न
नारायणगाव येथील जंबो द्राक्ष उत्पादक शेतकरी सचिन तोडकरी व रामदास तोडकरी म्हणाले की, साडेचार एकर क्षेत्रात
जंबो द्राक्ष बाग आहे. मागील वर्षी एकरी सात ते आठ टन उत्पादन निघाले होते. द्राक्षाला प्रतिकिलो शंभर रुपये बाजारभाव मिळाला होता. यावर्षी एकरी अडीच ते तीन टन उत्पादन निघाले आहे. मात्र डी. जे. एक्स्पोर्ट्स कंपनीने
प्रतवारीनुसार प्रतिकिलोग्रॅम १७५ ते २०५ रुपये या बाजारभावाने द्राक्ष खरेदी केली आहेत. साडेचार एकर क्षेत्रात सुमारे १२ टन द्राक्षाचे उत्पादन निघाले असून विक्रीतून सुमारे २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.


जंबो द्राक्षाला प्रतिकिलोग्रॅम मिळालेले मागील तीन वर्षाचे बाजारभाव व एकरी उत्पादन
वर्ष...................... रुपये............. टन
२०२३.........७५ ते ९० .........(पाच ते सात टन)
२०२४.........६० ते १००.........पाच ते सहा टन
२०२५.........७५ ते १२०.........सहा ते सात टन
२०२६.........१५० ते २०५.........अडीच ते तीन टन


07997

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT