पुणे

बेल्हा-जेजुरी रस्त्यावर टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू

CD

नारायणगाव, ता. ४ : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोची धडक बसून चंद्रकांत विठ्ठल नाईकवाडी (वय ४०, रा. बेल्हे, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास बेल्हा- जेजुरी रस्त्यावर पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे झाला. या प्रकरणी चालक नवनाथ त्रिंबक पवार(रा. चिंचणी, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली. चंद्रकांत नाईकवाडी हे पारगाव तर्फे आळे येथे बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभे होते. दरम्यान, भरधाव वेगाने मागून आलेल्या टेम्पोची त्यांना धडक बसली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT