पुणे

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुजन कृतज्ञता सोहळा

CD

नसरापूर, ता. ९ ः नेताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल कामथडी (ता. भोर) शाळेच्या सन २००२ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेत तत्कालीन व विद्यमान शिक्षकांचा गौरव करत गुरुजन कृतज्ञता सोहळा पार पाडला.

उंबरे (ता. भोर) येथील श्री संत सेवा संघाच्या साधना केंद्रावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला नेताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गोविंद वाल्हेकर, तुकाराम आवताडे, जयवंत कुंभार, विजय पठारे, योगेश बोन्द्रे, सुरेश खाटपे, संगीता वाल्हेकर, सुवर्णा साळुंके, सौदामिनी जगदाळे, वैशाली इंगुळकर, आबा घोरे, नितीन दामगुडे या शिक्षकांचा कृतज्ञतापत्र, स्मृतिचिन्ह, सार्थ श्रीमदभगवद्गीता ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना या शाळेत मिळालेल्या संस्कारामुळेच आम्ही घडलो व जीवनात यशस्वी झालो आहोत, शाळेचे संस्कार व तत्कालीन शिक्षकांची शिकवणूक जीवनात विसरू शकत नसल्याचे आवर्जून नमूद केले.
यावेळी शाळेचे संस्थापक संपत इंगुळकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविक शिवव्याख्याते विजय खुटवड यांनी केले. सूत्रसंचालन रत्नमाला मांढरे-पवार व प्रसाद पंडित यांनी, तर आभार राजू सपकाळ यांनी मानले.
---------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT