पुणे

वरवे येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

CD

नसरापूर, ता. २३ : पुणे सातारा महामार्गावर वरवे (ता. भोर) येथील ‘हॉटेल कैलास भेळ’समोरील सेवा रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाच्या सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी स्वप्नाली मोहित निगडे (वय २९, रा. खेड शिवापूर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली.
निगडे या बुधवारी (ता. २२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पती, सासू व भाऊ यांच्यासह हॉटेल कैलास मधून नाष्टाकरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर लावलेल्या त्यांच्या मोटारीकडे पायी चालत येत असताना सेवा रस्ता पार केल्यानंतर मुख्य महामार्गावर त्यांच्यामागून लाल रंगाच्या स्पोर्ट बाईकवरुन दोनजण आले. त्यांनी जवळ येताच दुचाकीचा वेग कमी केला आणि मागे बसलेल्या व्यक्तीने स्वप्नाली यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. यावेळी स्वप्नाली यांनी ओरडत गळ्यातील मंगळसूत्र धरले. त्यामुळे अर्धे मंगळसूत्र तुटून चोरट्याच्या हातात गेले. त्यानंतर चोरटे जोरात सातारा दिशेने गेले. याचवेळी स्वप्नाली यांच्या पती मोहित यांनी दुचाकी चालकांनी काहीतरी केले असल्याचे वाटल्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते वेगात निघून गेले.
या चोरीमध्ये दोन लाख पन्नास हजारांचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी दोन चोरट्यांविरोधात राजगड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलिस फौजदार श्रीकांत जोशी हे पुढील तपास करत आहेत.

महामार्गावरील लुटीच्या घटनांमध्ये वाढ
महामार्गवर १६ फेब्रुवारी रोजी शिवापूर येथे हॉटेल कंदिलजवळ पोलिस असल्याची बतावणी करत दोघांनी एकाची सोन्याची चेन व अंगठी, अशी ४८ हजार रुपयांची लुट केली. त्यानंतर १९ रोजी शिवापूर येथेच पेट्रोल पंप चालकाची पावणेचार लाखाची लुट करण्याची घटना घडली. नंतर अवघ्या एक दिवसाच्या फरकाने २१ रोजी केळवडे गावच्या हद्दीतील हॉटेल लक्ष्मीसमोर मोटारमधील लॅपटॉप व कागदपत्रे चोरीस गेली आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २२ रोजी दुचाकीवरील दोघांनी सोने हिसकावण्याची घटना घडली. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर लुटीच्या घटना वाढत आहे. मात्र, तपास लागत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT