पुणे

ट्रायकोग्रामामुळे कीड नियंत्रण होऊन बहरणार सेंद्रिय शेती

CD

नसरापूर, ता.४ : पिकावर नियंत्रणासाठी रासायनिक औषधांचा वापर न करता ‘जीवो जिवस्य जीवनम’ म्हणजे एक जीव दुसऱ्या जिवावर जगतो. या तत्त्वाचा वापर करून ट्रायकोग्रामा या परोपजीवी मित्र कीटकाव्दारे जैविक कीड नियंत्रण करण्याचा प्रकल्प पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवला आहे. यामुळे पिकांवर होणाऱ्या रासायनिक खते किंवा औषधांचा खर्च वाचेल व सेंद्रिय शेतीत वाढ होईल.

कृषी महाविद्यालय पुणे जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा कीटकशास्त्र विभागाच्या वतीने जैविक घटकांचे उत्पादन व उपयोग या कार्यानुभवात्मक शिक्षण प्रकल्पाचे काम डॉ. संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ट्रायकोग्रामा या परोपजीवी मित्र कीटकांचे संशोधन व उत्पादन करण्यात येत आहे ट्रायकोग्रामा हा गांधीलमाशी वर्गीय परोपजीवी मित्र कीटक असून, तो पतंग वर्गीय किडीच्या अंड्यामध्ये अंडी घालून त्या किडीचा अंडी अवस्थेतच नाश करतो. त्यामुळे आरोपआपच कीड नियंत्रण होते.

ट्रायकोग्रामाच्या अंडी, अळी व कोष या अवस्था यजमान किडीच्या अंड्यातूनच पूर्ण होतात व पूर्ण वाढ झालेले ट्रायकोग्रामा बाहेर पडतात ते पाच मीटर व्यासाच्या क्षेत्रातील किडींनी घातलेल्या अंड्याचा शोध घेतात व खातात. हानिकारक किडीची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात आणि त्या अंड्याचा आतील भाग खातात. हा ट्रायकोग्रामा अनेक प्रकारच्या किडीवर उपजीविका करतो मुख्यतः ऊस, मका, भातावरील खोडकिडा, कापशीवरील बोंडअळी, सूर्यफुलावरील अळी, वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, डाळिंबा वरील सुरसा इत्यादी किडीचे यशस्वीपणे नियंत्रण होते.

२५ तासात बाहेर येऊन किडीवर नियंत्रण
कीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाचे संगोपन प्रयोगशाळेत करून त्यांची अंडी पोस्टकार्ड सारख्या दिसणाऱ्या कागदावर चिकटवली जातात. त्यांना ट्रायकोकार्ड असे म्हटले जाते. या कार्डचे कात्रीने २० तुकडे करून ८ ते १० मीटर अंतरावर झाडाच्या आतील बाजूने किंवा पानाखाली टाचणीने अडकवले जाते. तेथील प्रौढ ट्रायकोग्रामा २५ तासात बाहेर येऊन किडीवर नियंत्रण मिळवतात.


ट्रायकोग्रामा वापर करताना घ्यावयाची काळजी
- ट्रायकोग्रामाचे प्रसारण करण्यापूर्वी रासायनिक फवारणी दहा दिवस टाळावी
- पिकाभोवती शक्यतो झाडाझुडपांचे कुंपण असावे.
- पिकास पाणी दिल्यानंतर परोपजीवी किटकांचे प्रसारण करावे.
- ट्रायकोकार्ड घेताना ट्रायकोग्रामा निघण्याची तारीक तपासून पहावी.
- ट्रायकोग्रामाचे प्रसारण शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावे.
- महाविद्यालयातील साक्षी सावंत,प्रिया रायकर,गायत्री झेंडे,समृद्धी पवार या विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी आहेत त्यांनी माहिती देताना सांगितले की, कृषी महाविद्यालय पुणे येथे - -- कार्डचे उत्पादन व वितरण होत आहे फुले ट्रायकोकार्ड हे प्रती १०० रुपयांना उपलब्ध आहे या कार्डची मागणी एक महिना अगोदर नोंदवावी लागते हे कार्ड २५ ते ३० दिवस - १० डिग्री सेल्सियस तापमानात साठवता येतात, किडीच्या प्रादुर्भावाप्रमाणे कार्ड घेऊन पिकास प्रसारित करावी लागतात. दरम्यान, याबाबत अधिक माहितीसाठी डॉ. संतोष मोरे (८३२९५१३८९१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

04332

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT