पुणे

नसरापुरात एसटीच्या मागची चाके निखळली

CD

नसरापूर, ता.१ : सातारा-पुणे महामार्गावर नसरापूर (ता. भोर) येथील उड्डाणपुलावर रविवारी (ता.१) दुपारी वाहतुकीच्या गर्दीतच एसटी बसच्या मागील डाव्या बाजूची दोन चाके निखळली. यामुळे बस तिरकी रस्त्यावर पडली तर बाहेर निघालेली चाके रस्त्याने बऱ्याच अंतरावर जाऊन पडली. मात्र, सुदैवाने घटनेमुळे कोणताच अपघात झाला नाही.
कोल्हापूर गडहिंग्लजवरून मुंबईला निघालेली एसटी बस (क्र.एम एच ०९ एफ एल ७३६१) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नसरापूर चेलाडी येथील उड्डाणपुलावर आली व अचानक तिच्या डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळली. यामुळे मागील डावी बाजू रस्त्यावर टेकून बस बरेच अंतर तशीच पुढे गेली. निघालेल्या दोन्ही चाकांपैकी एक मागे उताराने गेले तर दुसरे पुढील चढाच्या दिशेने गेले.
अचानक बस एका बाजूला पडल्याने प्रवाशांत मोठी घबराट पसरली. चालकाला देखील थोडा वेळ काय झाले कळाले नाही. दरम्यान, यावेळी सुदैवाने मोटार किंवा इतर मोठी वाहने नसल्याने अपघात टळला. शिवाय बस देखील उड्डाणपुलाच्या चढावर असल्याने बसचा होणार मोठा अपघात टळला. बस उतारावर असती तर चाके निघून गेल्यावर वेगात बस पलटी होऊन मोठा अपघात झाला असता.

टोलनाक्यावरील सुरक्षा गस्तीच्या वाहनाने क्रेनव्दारे बस एका बाजूने उचलून घेतली व नवीन नटबोल्टसह पुन्हा चाके बसवून बस बसविली.
या घटनेमुळे एसटीमधील प्रवाशांना अडीच ते तीन तास ताटकळत बसावे लागले. दरम्यान, वाहतुकीस अडथळा झाल्याने कोंडी देखील झाली होती.

05417

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest Crime Data : जंतर-मंतरवरील आंदोलनात घुसले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १००० लोक; AI ने ओळखले चेहरे, पोलीसही चकित

हार्दिक पांड्यासाठी फक्त CSK नाही, तर 'हा' संघही करतोय प्रयत्न! थेट कर्णधारालाच Mumbai Indians सोबत ट्रेड करण्याची चर्चा

Latest Live Updates Marathi : उजनी धरण १०० टक्के भरले, भीमा नदीत ६१,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा

Paris Knife Attack: पॅरिस हादरलं! गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूहल्ला; आरोपीचा धक्कादायक दावा, म्हटला "मला अल्लाहने पाठवलं"

PM Modi Video Meta Apology : गलतीसे मिस्टेक! PM मोदींचा व्हिडिओ भारतात ब्लॉक, मेटाने चूक कबूल करत मागितली माफी

SCROLL FOR NEXT