खेड शिवापूर, ता.२५ : खेड शिवापूर (ता.हवेली) ग्रामपंचायत सदस्यांनी वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी पुणे यांनी सरपंचांसह चार सदस्यांना पदावर राहण्यास अपात्र ठरवले आहे. याबाबत शुक्रवारी (ता.१८) आदेश काढण्यात आले आहेत.
खेड शिवापूर ग्रामंपचायतीचे माजी सदस्य व आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ओव्हाळ व यशवंत जगताप यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. खेड शिवापूर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन २०२०-२१ मध्ये पार पडली. यावेळी सरपंचपद इतर मागासवर्गासाठी राखीव होते व निवडणुकीत नागरिकांचा मागासप्रवर्गातून निवडणूक लढवलेल्या सहा उमेदवारांनी विजयानंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहा महिने किंवा जास्ती जास्त एक वर्षाच्या कालावधीत जात पडताळणी करून प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या राखीव जागावर विजयी झालेल्या सात सदस्यांनी त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्या बाबत ओव्हाळ व यशवंत जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत सदस्य अमोल रामदास कोंडे, स्वप्नील सुरेश जगताप, स्वप्नाली मोहित निगडे, बेबी धनाजी ओव्हाळ, पल्लवी विजय पायगुडे, अशोक भारत अवतारे व करुणा व्यंकट शिखरे यांना अपात्र करण्याची मागणी केली होती.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबधीतांना नोटीस काढून सुनावणी निश्चित करून अर्जदार व जाब देणार यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी निर्णय देत अर्जदार प्रवीण ओव्हाळ, यशवंत जगताप यांचा अर्ज अंशतः मान्य करत खेड शिवापुरच्या विद्यमान सरपंच पल्लवी विजय पायगुडे, स्वप्नाली मोहित निगडे, बेबी धनाजी ओव्हाळ व करुणा व्यंकट शिखरे या चार सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपल्यापासून म्हणजे ता.११ जुलै २०२४ पासून सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.
तक्रारदार ओव्हाळ यांनी या निकालाबाबत बोलताना सत्याचा विजय हा निश्चित असतो. या निकालाने खऱ्या अर्थाने खेड शिवापूरमधील मूळ ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम झाले आहे याचे मला समाधान वाटते.
याबाबत सरपंच पल्लवी यांचे पती विजय पायगुडे यांच्याशी संपर्क साधला असता या निकालाबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांशी बोलत असून, याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे अर्ज करणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.