पुणे

हवेली महसूल विभागाकडून खेड शिवापूर येथे वृक्षारोपण

CD

खेड शिवापूर, ता. ४ : महसूल सप्ताहानिमित्त हवेली तालुका महसूल विभागाच्या वतीने श्रीरामनगर व गाऊडदरा गावांना जोडणाऱ्या पाणंद रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
खेड शिवापूर (ता हवेली) मंडल भागातील श्रीरामनगर व गाऊडदरा गावांना जोडणाऱ्या पाणंद रस्त्यालगत दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. तहसीलदार किरण सुरवसे, निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे, महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे खडकवासला ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र पवार, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, किशोर पाटील, संदीप शिंदे, गौतम ढेरे, सचिन चव्हाण, सचिन काळे, गोपाळ जाधव, कविता चव्हाण, संकेत बेरड पाटील, ग्राम महसूल अधिकारी रवी काळे, मनोज तेलंग, श़ंकर दिवेकर आदी उपस्थित होते
श्रीरामनगर ते गाऊडदरा या गावांना जोडणारा हा रस्ता पूर्वी ओढ्याच्या कडेने पाऊलवाटेच्या स्वरूपात होता. त्यातील सुमारे दोन किलोमीटर पाणंद रस्ता अतिक्रमणामुळे बंद होता. महसूल विभागाच्या स्थळपाहणीनंतर निर्णय देऊन तो मोकळा करण्यात आला. सर्व शेतकऱ्यांनी सहमतीने तो सुमारे २५ फूट रुंदीचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कच्चा रस्ता, खडीकरण व डांबरीकरण झाले. त्याच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : आयुष कोमकर खून प्रकरण; आंदेकर टोळीच्या मारेकऱ्यांची धुळे कारागृहात रवानगी

अमेरिकेवर शटडाऊनचं संकट! पैसे संपले, निधी मंजुरीला मतं पडली कमी; अनेक सरकारी सेवा बंद करण्याची वेळ

Severe Cyclone : कोकणात चक्रि‍वादळाची स्थिती, तीव्रता भयानक; अनेक घरांचे नुकसान

Heart Attack Deaths India: भारतात दररोज 175 लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू , एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक माहिती

Latest Marathi News Live Update: दसऱ्यानंतर अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT