पुणे

दहशत माजवणाऱ्यास नसरापूरकरांचा दणका

CD

नसरापूर, ता. २६ : नसरापूर (ता. भोर) येथे भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी हटकल्याने दुचाकीस्वाराने एक कोयता व सुरा हवेत फिरवून एकाला मारहाण करत दहशत माजवली. वेळीच नागरिकांनी पकडून आरोपीला राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. स्वप्निल विजय जाधव (रा. कळवा, नवी मुंबई; सध्या रा. जांभळी, ता. भोर), असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत राहुल अंकुश खुटवड यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मंगळवारी (ता. २५) नसरापूर येथे सकाळी अकरा वाजण्याचा सुमारास चेलाडी- नसरापूर रस्त्यावर स्वप्निल जाधव हा भरधाव दुचाकी पळवत होता. यावेळी फिर्यादी राहुल यांनी त्याला थांबवून सांगितले की, शालेय विद्यार्थी, नागरिकांची रस्त्यावर वर्दळ आहे. वाहन हळू चालव, अपघात होईल. या कारणावरून चिडून स्वप्निल याने राहुल व इतर लोकांना शिवीगाळ व दमदाटी करून कोयता व सत्तूर हवेत फिरवून दहशत निर्माण केली. यावेळी थांबलेल्या लोकांची पळापळ झाली. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने लिंबाजी कोळपे, काळूराम रसाळ, अक्षय खंडाळकर, तेजस खुटवड, चंद्रकांत लांडे यांनी स्वप्निल याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. राजगड पोलिसांनी स्वप्निल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्याकडील एम.एच ०४ जे डब्ल्यु ०८४७ या क्रमांकाची दुचाकी व हत्यार जप्त केले. पुढील तपास पोलिस हवालदार औदुंबर अडवाल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT