पुणे

निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांना फटका

CD

नसरापूर, ता. २४ : महाबिजच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकरी गटांना देण्यात आलेले परभणी शक्ती हे ज्वारी बियाणे निकृष्ट निघाले. यामुळे भोर तालुक्यातील २४ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बियाणांच्या ताटव्यांची वाढच न झाल्याने ज्वारी तर नाहीच शिवाय गुरांच्या चाऱ्यासाठीचा कडबा देखील उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकरी २८ हजार रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त शेतकरी करीत आहेत.

भोर तालुक्यातील २४ गावांमध्ये महाबिजने ज्वारी एकरी चार किलोप्रमाणे गटाच्या २५ शेतकऱ्यांना बियाणे दिले होते. त्याची पेरणी साहाय्यक कृषी अधिकारी यांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी केली होती. या बियाणांची उगवण झाली परंतु दोन ते अडीच महिने झाले तरी त्या ज्वारीची अपेक्षीत वाढ झाली नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत तालुका कृषी विभाग व महाबिज यांच्याकडे तक्रार केली. रब्बीचा वाया गेलेला हंगाम, ज्वारी उत्पादन व जनावरांचा चारा याला फटका बसला आहे. त्यामुळे भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ज्वारीची अधारभूत किंमत तीन हजार ७४९ प्रतिक्विंटल आहे. कडब्याचा समावेश करून शेतकऱ्यांचे एकरी २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महाबिजच्या बियाणामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्याची तातडीने दखल घेऊन नुकसान भरपाई देवी. अन्यथा शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल ,असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी दिला आहे.

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांच्याशी निकृष्ट बियाणांबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, परभणी शक्ती ज्वारी बियाणांची काही गावात योग्य वाढ न झाल्याचे निदर्शनास आले आहे. पाऊस जास्त काळ राहिल्याने उशिरा पेरणी झाली व बियाणे उगवल्यावर त्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. त्याने वाढ खुंटली आहे. याबाबत महाबिजला कळवले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत कार्यवाही सुरू आहे.

परभणी शक्ती हे ज्वारीचे वाण बायोफोर्टीफाईड प्रमाणित व एकरी १५ ते २० क्विंटल उत्पादन देणारे वाण आहे. भोर व राजगड तालुक्यात मागील वर्षी देखील हे वाण दिले होते. आलेल्या तक्रारीनुसार आमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली असता यावर्षीच्या जास्त पावसाने खोडकिडीचा व मावा रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. बियाणांमध्ये दोष नाही परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत आमच्या अकोले येथील मुख्यालयात नुकसानीचा अहवाल पाठवला जाणार आहे.
- पुरुषोत्तम फाटे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार परभणी शक्ती या ज्वारी बियाणाची पेरणी केली. गेले दोन ते अडीच महिने झाले तरी पिकाची वाढ फक्त दोन फुटांपर्यंत झाली आहे. यामुळे ज्वारी उत्पादनाबरोबर गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. महाबिज तसेच कृषी विभागाने या नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी.
- दिनेश शिळीमकर, श्री म्हातोबा कृषी बचत गटाचे शेतकरी, कुरंगवडी (ता.भोर)


या गावांमध्ये अधिक नुकसान
चिखलगाव, वेनवडी, ससेवाडीस, कुरंगवडी, सांगवी बु., पांडे, राजापूर, सारोळा, वडगावडाळ, कर्णावड, कारी, वागजवाडी, केंजळ आदी गावामध्ये नुकसान झाले आहे.


06221

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT