पुणे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षाची सक्तमजुरी

CD

नसरापुर, ता. २६ ः भोर तालुक्यातील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी हा निर्णय दिला. आरोपी बजरंग रामचंद्र खोपडे (वय ३२, रा. तेलवडी, ता.भोर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना नोव्हेंबर २०१८ साली घडली होती. पिडीत अल्पवयीन मुलीस आरोपीने धमकावत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, प्रकृती बिघडल्याने २९ मार्च २०१९ रोजी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार, आरोपी बजरंग खोपडे याच्यावर अत्याचार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.
या खटल्यात सरकार पक्षाकडून वकील अरुंधती ब्रम्हे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरला तसेच अकरा साक्षीदार तपासले. डीएनए अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने खोपडे यास २० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तसेच भारतीय दंड संहिता कलम ५०६ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. जी. राठोड यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT