पुणे

कापूरहोळमधील अतिक्रमणांवर हातोडा

CD

नसरापूर, ता. २७ : कापूरहोळ (ता. भोर) येथील नारायणपूरकडे जाणाऱ्या चौकात सोमवारी (ता.२७) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कारवाई केली व सेवा रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविली.

पुणे-सातारा महामार्गावर सहापदरीकरणाच्या कामासाठी संपादित केलेल्या जमिनीवर सेवा रस्त्याशेजारी हॉटेल व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. ती काढण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार नोटीस बजावल्या होत्या. मात्र, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, आज सकाळी दहा वाजताच पोकलेन, दोन जेसीबी, क्रेन, एक गॅस कटर, दोन हायवा डंपर, दोन गस्ती पथकाची वाहने, २५ पोलिसांसह महामार्ग प्राधिकरणाचे सुमारे २० अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई केली.

दरम्यान, नारायणपूर रस्त्याच्या अलीकडे हॉटेल आनंद येथे महामार्गाच्या मध्यापासून साडेसत्तावीस मीटरपर्यंत तर नारायणपूर रस्त्याच्या पलीकडे हॉटेल बालाजीपासून पुढे महामार्गाच्या मध्यापासून तीस मीटरवरील अतिक्रमणे काढण्यात आली.

या कारवाईत महामार्ग प्राधिकरणाचे सुभाष घंटे, लक्ष्मण पाटील, पीएस टोल रोडचे अभिजित गायकवाड, पोलिस अधिकारी तुकाराम राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

शेड पाडू न देण्याची भूमिका
दुकानदार मधुकर उकिर्डे यांचा मुलगा व सून यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. १९८१ च्या संपादनाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नसून ती मिळाल्याशिवाय दुकानाचे शेड पाडू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

06333

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT