न्हावरे, ता. ३ ः हडपसर ते न्हावरे (ता. शिरूर) मार्गावर पुणे महानगरपालिकेची पीएमपीएमएल बससेवा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक संचालक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पीएमपीएमएलची बससेवा सोलापूर महामार्गावरील हडपसर ते वरवंड अशी सुरू आहे. त्याचप्रमाणे हडपसर- चौफुला- पारगाव मार्गे शिरूरच्या पूर्व भागातील प्रामुख्याने न्हावरेपर्यंत सुरू करावी. त्यामुळे न्हावरे, आंबळे, गुनाट, कोळगाव डोळस, आंधळगाव, आलेगाव पागा, वडगाव रासाई आदी गावातील विद्यार्थ्यांना, प्रवाशांना, नोकरदारांना, शेतकऱ्यांना हडपसर त्याचबरोबर पुणे येथे जाण्यासाठी बस फायदेशीर ठरेल. नुकतेच चौफुला ते न्हावरे रस्त्याचे नव्याने काम झाले आहे. त्यामुळे रस्ता चांगला आहे. मात्र, दळणवळणाचे साधन नसल्यामुळे प्रवासी, व्यापारी व विद्यार्थ्यांची कुंचबणा होत आहे. त्यामुळे गरज व मागणी लक्षात घेऊन हडपसर ते न्हावरे बससेवा सुरू करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.