पुणे

ओतूर येथे ‘दहावीच्या उंबरठ्यावर’ शिक्षक-पालक सभा

CD

ओतूर, ता. २३ : ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात ‘दहावीच्या उंबरठ्यावर’ संदर्भात शिक्षक-पालक सभा झाल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
दरवर्षी मार्च महिन्यात इयत्ता नववी मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी दहावीच्या उंबरठ्यावर हा उपक्रम चैतन्य विद्यालयात राबवला जातो. नववीतील विद्यार्थ्यांचे पालक निमंत्रित केले जातात व त्यांच्याशी विधायक व विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात इयत्ता दहावीसाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यात येते.
या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रदीप गाढवे होते. या वेळी इयत्ता दहावीचे वर्षाचे महत्त्व, सोशल मीडिया, संगत यासंदर्भात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बी. आर. खाडे यांनी माहिती दिली. शरद माळवे यांनी विद्यार्थी शिस्त, व्यसनाधीनता, उन्हाळी सुट्टीतील नियोजन पालक व शिक्षक यांची जबाबदारी याबद्दल ऊहापोह केला. संस्थेचे उपसचिव पंकज घोलप यांनी नवीन शैक्षणिक धोरण व त्या संदर्भात विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी स्वीकारावयाचे बदल या संदर्भात मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक संजय हिरे यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांच्या वतीने रेश्मा तांबे, जयश्री डुंबरे, मनीषा बर्डे, अनिल काका तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. मोठ्या संख्येने पालक यावेळी उपस्थित होते. या वेळी पर्यवेक्षक अनिल उकिरडे, पालक शिक्षक संघाचे सचिव अजित डांगे, शिक्षक प्रतिनिधी संतोष सोनवणे, आसावरी गायकर, वनिता भोर, अमित झरेकर आदी शिक्षक उपस्थित होते. ईश्‍वर ढमाले व अरविंद आंब्रे यांचेही सहकार्य लाभले.
देवचंद नेहे यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश ताठे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT