ओतूर, ता. ४ : डिंगोरे (ता. जुन्नर) येथील माळशेज ॲग्रो टुरिझम सेंटर येथे महाराष्ट्रातील रसायनमुक्त पदार्थ निर्मिती करणाऱ्या १०० हून अधिक उत्पादकांची राज्यस्तरीय उद्योजक संवाद कार्यशाळा शनिवारी (ता. ५) व रविवार (ता. ६) आयोजित केल्याची माहिती मालेगाव येथील गोकूळ ग्राम किसान उद्योग समूहाचे गोकूळ देवरे व धोलवड येथील हेमनाथ नलावडे यांनी दिली.
या कार्यशाळेत संपूर्ण राज्यातील जे-जे शेतकरी रसायनमुक्त पदार्थ निर्मिती करतात असे उद्योजक एकत्र येऊन संवाद साधणार आहेत. यावेळी सर्व शेतकरी उत्पादकांना टेक्निकल सपोर्ट आधुनिक मशिनरी मिनी व सेमी अटो प्लानसाठी सपोर्टबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उद्योजक संवाद कार्यक्रमात ७०हून अधिक रसायनमुक्त प्रॉडक्टचे प्रदर्शन आहे. सर्व विक्री उद्योजकांना प्रॉडक्टची पाहणी, तपासणी, टेस्ट, चवबाबत माहिती घेता येणार आहे. रसायनमुक्त उत्पादन क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्पादकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.