ओतूर, ता. ३० : ओतूर (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात रविवारी (ता.२९) कांद्याच्या १० हजार ३६५ पिशवीची आवक झाली. त्यात उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलोस १७ ते २० रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली.
ओतूर उपबाजारात रविवारी व गुरुवार असे आठवड्यातून दोन दिवस कांदा लिलाव केले जातात. मागील बाजाराच्या तुलनेत ओतूर उपबाजारात या बाजारी कांदा पिशवीची आवक घटली असून बाजारभावात स्थिर आहे.
ओतूर उपबाजारात रविवारी एकूण १०३६५ कांदा पिशवी आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोला गोळा कांदा १७० ते २०१, सुपर कांदा १२० ते १८०, गोल्टी/ गोल्टा ३० ते १३०, बदला कांदा २० ते १०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.
ओतूर उपबाजारात गुरुवारी (ता.२६) एकूण ११४५६ कांदा पिशवी आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोला गोळा कांदा १७५ ते २०५ रुपये असा बाजारभाव मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.