पुणे

पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी धरणांतून विसर्ग

CD

ओतूर, ता.२६ : पिंपळगाव जोगा ८९ टक्के तर चिल्हेवाडी धरण ९७ टक्के मंगळवारी (ता.२६) भरले आहे. यामुळे पिंपळगाव जोगा धरणांमधून पुष्पावती नदीत १००० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे उपविभाग क्रमाक एक नारायणगावचे उपविभागीय अभियंते आर.जी.हांडे यांनी दिली.

पिंपळगाव जोगा धरणातून चार दिवसांपासून कालव्याव्दारे २८० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर चिल्हेवाडी धरणांमधून सोमवारी रात्रीपासून २५०० क्युसेकने मांडवी नदीत विसर्ग सुरू आहे. यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाकडून पुष्पावती नदी तीरावरील व मांडवी नदीतीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या नागरिकांनी कोणीही नदीपात्रात उतरू नये, नदीमधील पाण्याचे पंप, काठावरील मोटारी व इतर साहित्य यांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच कोणीही नदीपात्रात जाऊ नये तसेच जनावरांना ही नदीत जाऊन देऊ नये, असे आवाहन कुकडी पाटबंधारे उपविभागाकडून करण्यात आले आहे.

पिंपळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीत पाण्याचा विसर्ग केल्यामुळे डिंगोरे परिसरातील नदी लगतच्या शेतामध्ये पाणी जाऊन शेतीचे व बांधाचे मोठे नुकसान झाले आहे. धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग कमी करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे यांनी केली आहे.

00647

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांचा मुस्लिम तरुणाची किडनी घेण्यास नकार; आरिफ खानने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला, पण...

Pune Ganesh Festival 2025 : फुले, फळांच्या खरेदीने बाजार फुलला; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरांमध्ये गर्दी

Ganesh Chaturthi 2025: आश्रमातला उपद्रवी उंदीरच बनला बाप्पाचा साथीदार; वाचा बाप्पाच्या वाहनामागची अद्भुत गोष्ट

Latest Maharashtra News Updates : दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणुकीला सुरुवात

Solapur News:'अनियमितता असलेल्यांची रद्द होणार वैयक्तिक मान्यता'; मान्यता नियमानुसार घेतल्याचे शाळांचे म्हणणे, उपसंचालकांचा सप्टेंबरमध्ये निर्णय

SCROLL FOR NEXT