ओतूर, ता. ३० : जुन्नर तालुक्यात कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत पाच धरणे झाल्याने तालुक्यातील बहुतेक भाग हा बारमाही बागायती झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये वेळेवर मंजूर मिळणे मोठे कठीण होऊन बसले आहे. सध्या महिला मजूरांना ४०० ते ९०० तर पुरुष मजुराला ८०० ते १०० रुपयांपर्यंत मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागते. अशा बिकट परिस्थितीत यांत्रिकीकरणामुळे शेती करणे जुन्नरमधील शेतकऱ्यांना सोपी ठरत आहे.
मजुरीचे दर गगनाला भिडलेले असताना बदलत्या काळात यांत्रिकीकरणामुळे शेती अधिक सोपी, वेगवान आणि फायदेशीर ठरत आहे. परंपरागत शेतीतील कष्टदायक कामे आता आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने कमी वेळेत आणि अचूकपणे पार पडत आहेत. कष्ट कमी, कार्यक्षमता जास्त नांगरणी, पेरणी, खुरपणी, फवारणी, कापणी अशी अनेक कामे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, सीड-ड्रिल, पॉवर स्प्रेयर, हार्वेस्टरमुळे सहज होतात. त्यामुळे मजुरीवरील अवलंबन घटते आणि शेतकऱ्याचा वेळ व श्रम वाचतो.
उत्पादनात वाढ, खर्चात घट
यंत्रांमुळे पेरणीची समानता, खत–औषधांचा योग्य वापर आणि वेळेवर कापणी शक्य होते. परिणामी उत्पादनात वाढ होते, नुकसान कमी होते आणि एकूण खर्च घटत आहे..
वेळेचे व्यवस्थापन आणि बहुपीक पद्धती वेळेवर कामे झाल्याने पिकांची कालमर्यादा पाळली जाते. यामुळे दुहेरी/बहुपीक पद्धती स्वीकारणे सोपे जाते आणि वार्षिक उत्पन्न वाढते.
व्यवस्थापनामुळे उत्पन्नात वाढ
आधुनिक यंत्रे, ड्रोन फवारणी, स्मार्ट उपकरणे यांमुळे शेतीत तंत्रज्ञानाची जोड मिळते.त्यामुळे तरुण पिढीसाठी शेती अधिक आकर्षक ठरते. तसेच आता एक आय टेक्नॉलॉजी वापरून शेतातील पिकाला कसली गरज आहे ते ओळखून त्या प्रमाणे व्यवस्थापण केले जाऊ लागल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
01238