पाबळ, ता.९ : कान्हूर मेसाई (ता.शिरूर) येथील तीन वेगवेगळ्या तलावांचे खोलीकरण व पट्टी भराव करण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण झाले आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावातील जलसाठा वाढणार असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.
कामाअंतर्गत ननवरे दळवी वस्ती तलाव, हडपदरा तलाव आणि धोबी वस्ती तलाव यांचे खोलीकरण व मजबुतीकरण करण्यात आले. यामुळे पावसाळ्यात अधिक पाणी साठून राहील. जेणेकरून भूजल पातळी वाढेल, आणि पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होईल.
उद्घाटन सोहळ्याला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बबन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी दळवी, माजी सरपंच सचिन पलांडे, उपसरपंच सोपान पुंडे, उद्योजक अमोल पुंडे, मनोज शिंदे, सचिव सदाशिव पुंडे, अबिद तांबोळी, मोहन पुंडे, योगेश ननवरे, अजित तळोले, राज दळवी आदी शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, उपक्रमामुळे गावाच्या दुष्काळी परिस्थितीला मदतीचा हात मिळाला आहे. तलावांचे खोलीकरण झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
01097
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.