कवठे येमाई, ता.२५ : ‘‘आईवडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहावे. मुलींनी बेगडी प्रेमापासून सावध रहावे व आई वडिलांना दुःख न देता त्यांच्या विश्वासास पात्र ठरावे,’’ असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी केले.
मलठण (ता.शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये युवा उद्योजक सागर आप्पा दंडवते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
केक कापून, हारतुरे घालून वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, याला छेद देत दंडवते यांनी सामाजिक बांधिलकी जपत मलठण व परिसरातील विद्यार्थ्यांना १५ हजार वह्यांचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमात पहिली तेबारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणारे धाराशिवचे युवा कबड्डीपटू स्वाभिमान शिंदे, विक्रीकर अधिकारी अभिजित गायकवाड, सनदी लेखापाल शुभम शिंदे, पुणे ग्रामीण पोलिस दलातील अनिल शिंदे, राज्य राखीव पोलिस दलातील प्रशांत कोठावळे, वैद्यकीय क्षेत्रातील शुभम गोडसे, प्रतीक्षा भोसले, माधुरी गडदरे, सुयश महाले, बॅडमिंटन खेळाडू खुशी इनामदार, तलवारबाज सावी ताठे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनाही गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही कबड्डीमध्ये चमक दाखवणाऱ्या स्वाभिमान धनंजय शिंदे यांना सागर अप्पा दंडवते यांनी ५१ हजार १११ रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले. तसेच, खेळाडूंना दुखापत झाल्यास त्यावरील संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी वाढदिवसानिमित्त अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या शिरूर येथील मनशांती छात्रालयातील अनाथ विद्यार्थ्यांसाठी स्नेह भोजन दिले. प्राचार्य अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश गायकवाड, राजेंद्र लष्करे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुदाम गायकवाड यांनी आभार मानले.
01312
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.