पुणे

दुकान फोडून रोख रक्कमेसह साहित्य चोरीला

CD

कवठे येमाई, ता. २६ : अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या भोर बी-बियाणे दुकानाचा पत्रा उचकटत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे ६५ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत योगेश जिजाभाऊ सैद (वय ३४, रा. गावडेवाडी, ता. आंबेगाव) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
कवठे येमाई येथे अष्टविनायक महामार्गालगत योगेश सैद यांचे भोर बी-बियाण्यांचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी ते दुकान बंद करून घरी गेले होते. बुधवारी सकाळी दुकानात आल्यानंतर दुकानाचा पत्रा उचकटलेला दिसला. त्यांनी आत पाहणी केली असता दुकानातील बी-बियाणे, औषधे, रोख रक्कम व सीसीटीव्हीचे डिव्हीआर मशीन चोरीस गेले असल्याचे लक्षात आले. शिरूर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उबाळे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

SCROLL FOR NEXT