
Srikant Shinde Statement : ‘लोकसभा-विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिक विश्वास दाखवा. आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि दोन्ही महानगरपालिकांचे महापौर महायुतीचे झाले पाहिजेत, अशी ताकद द्या’, असे आवाहन शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज येथे केले. नागाळा पार्क येथील खानविलकर पेट्रोलपंपाशेजारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोक माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव आणि डॉ. सुजित मिणचेकर, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.