पुणे

टेकवडीचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा

CD

पाईट, ता. १९ ः ‘‘सौरग्राम टेकवडीचा आदर्श राज्यातील ग्रामपंचायतींनी घ्यावा,’’ असे मत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी टेकवडी (ता. खेड) येथे मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
राजगुरुनगरचे पर्याय प्रतिष्ठान, रोटरी क्लब आणि ग्रामपंचायत टेकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने पेरे पाटील यांचा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात पेरेपाटील यांनी अतिशय मार्मिक व साध्या उदाहरणातून गावाचा शाश्वत विकास कसा करायचा याचे मार्गदर्शन केले. छोट्या गोष्टीही समाजहिताच्या कशा असतात, असे अनेक प्रेरणादायी दाखले त्यांनी दिले व टेकवडीच्या सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले.
कार्यक्रमात पेरेपाटील यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य व यशदा मार्गदर्शक शरद बुट्टेपाटील, पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन बाजारे, दत्ता रुके, सरपंच विठ्ठल शिंदे, उपसरपंच ज्ञानेश्वर बेंडुरे, विजय वरूडकर, विविध कंपन्यांचे सीएसआर मार्गदर्शक, पश्चिम भागातील अनेक गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे ढोल आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात शरद बुट्टेपाटील यांनी टेकवडीचे पर्यटन विकास व सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बेंडुरे यांनी, तर आभार दत्ता रुके यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT