पुणे

तळेघर शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्यास प्रतिसाद

CD

भीमाशंकर, ता. १९ : तळेघर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजपूर केंद्रातील तळेघर, फलोदे, कोंढवळ, गवांदेवाडी, निगडाळे, म्हतारबाचीवाडी, राजपूर, पालखेवाडी, सावरली या नऊ शाळांचा शाळापूर्व तयारी मेळावा पार पडला. मेळाव्यात या शाळांमधील दाखलपात्र चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते. मेळाव्याचे उद्‍घाटन राजपूर केंद्राचे केंद्रप्रमुख चिमा रामा बेंढारी यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाले. यावेळी अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या बालकांचे स्वागत चॉकलेट व गुलाबाची फुले देऊन केले.
यावेळी मुलांची नावनोंदणी करून प्रत्येकाचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक व भाषा विकास, गणनपूर्व तयारीबाबत प्रात्याक्षिकांद्वारे क्षमतांची चाचपणी केली. पालकांची शाळापूर्व तयारीमध्ये भूमिका काय आहे, यावर पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विकासपत्रक तसेच कृतीपुस्तिका दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक गोविंद उतळे, मनोहर केंगले, उषा गवारी, शोभा जाधव, नयना चौधरी, तुकाराम डामसे, वामन गभाले, विविध शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
मेळाव्याचे संयोजन शिक्षक किरणराज शेंगाळे, संतोष थोरात, अनिल वालकोळी, मनोहर थोरात, काळूराम भांगरे, संतोष भवारी, पांडुरंग भवारी यांनी केले. प्रास्ताविक व आभार नयना चौधरी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांच कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Sunil Chhetri Net Worth: ऑडी, फॉर्च्युनर सारख्या कारचा मालक, बेंगळुरूमध्ये आलिशान घर; फुटबॉलपटू सुनील छेत्रीची संपत्ती किती?

Latest Marathi News Live Update: दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आप सहआरोपी - अंमलबजावणी संचालनालय

SCROLL FOR NEXT