पुणे

पिंपरीत एसआरटीपद्धतीने भात लागवड

CD

फुलवडे, ता. ६ : पिंपरी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी एसआरटीपद्धतीने लागवडीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अधून-मधून पाऊस कोसळत असल्याने तसेच पावसाची थोडी उसंत मिळत असल्याने भात लागवडींच्या कामांना वेग आला आहे. आंबेगाव तालुक्यात सध्या १६१ हेक्टर क्षेत्रात भात लागवड पूर्ण झाली आहे.
तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी पावसाचे माहेरघर म्हणून ओळखली जातात. यंदा मात्र कोंढवळ, निगडाळे, पिंपरी, पाटण, आहुपे, डोण, कोंढरे या भागात चांगला पाऊस झाल्याने भात खचरे भरली गेली. त्यामुळे या भागात भात लागवडी सुरू झाल्या आहेत. फुलवडे, बोरघर आदी भागात मात्र पुरेसा पाऊस न पडल्याने भात रोपांची वाढ झाली नाही. त्यामुळे या भागात भात लागवड अद्याप सुरू होऊ शकली नाही.

आंबेगाव तालुक्यातील ५२०० हेक्टर क्षेत्रात भात लागवड होत असते. दरवर्षी प्रमाणे यंदाही भात रोपांच्या जीवदानासाठी दमदार पावसाला सुरुवात होईल या प्रतीक्षेत येथील शेतकरी दिसत आहे. डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात आजअखेर १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, डिंभे धरणात शनिवारी (ता.६) पाणीसाठा ५.५१ टक्के झाला आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा ६.७९ टक्के इतका होता.


03171

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT