पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात चिखलीत शेळी ठार

CD

फुलवडे, ता. १९ : चिखली (ता. आंबेगाव) येथील इष्टेवाडीतील ‘शिवलदरा’ रानात मंगळवारी (ता. १८) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उषा ठकसेन लांघी या महिला आपल्या ११ शेळ्या चारत होत्या. त्यावेळी अचानक बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. त्यातील एक शेळी ठार केली. लांघी यांच्या डोळ्यासमोर बिबट्याने हल्ला केल्याने त्या खूप घाबरल्या. त्या मदतीसाठी जोरजोरात ओरडत होत्या. परंतु, आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कोणीही येऊ शकले नाही. बिबट्याचा शेळीवर हल्ला होत असतानाच त्यांनी धावतपळत इतर शेळ्यांना जमा करून घर गाठले.
दिवसाढवळ्या बिबट्या जनावरांवर हल्ला करत असल्याने या भागातील पशुपालक भयभीत झाले आहेत. जनावरांना रानात चारायला न्यायचे की नाही, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. लांघी यांचा शेती व पशुपालन हाच व्यवसाय असल्याने त्यांचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे. त्यातच एक शेळी गेल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे यशवर्धिनी संघ आंबेगावच्या समता विभाग, चिखलीच्या पदाधिकारी हौसाबाई लक्ष्मण बांगर, कार्यकर्ते शिवाजी शेटे व ग्रामस्थांनी सांगितले.
नागरिकांनी रानात जनावरे चारताना विशेष काळजी घ्यावी, सूर्य मावळण्यापूर्वी घरी जावे. जाताना समूहाने जावे व स्वतःजवळ काठी बाळगावी. त्यामुळे एकमेकांना मदत होईल. बिबट्या आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. बिबट्याने हल्ला केल्यानंतर ठार केलेल्या जनावराचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याशिवाय मृत पाळीव जनावराची विल्हेवाट लावू नये, असे आवाहन घोडेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT