फुलवडे, ता. ३० : ढाकाळे (ता. आंबेगाव) येथील ढाकाळे वन कक्ष क्र. २१२ मध्ये गुरुवारी (ता. २७) दत्तात्रेय गोविंद वाजे याने आग लावली. यामुळे रोपवनाचे जळून नुकसान झाले. त्याला भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियमांतर्गत नोटीस दिली व त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी घोडेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर म्हणाले की, आरोपी दत्तात्रेय वाजे याच्या वहिवाटीचे क्षेत्र मौजे ढाकाळे येथील राखीव वनास लागून आहे. त्याने निष्काळजीपणाने आपल्या शेतातील गवत पेटवून दिले. त्याची आग वनक्षेत्रात पसरून रोपवनाचे नुकसान झाले आहे. शासकीय राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून वणवा लावणे भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये प्रतिबंधित असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यास दोन वर्षांपर्यंत कारावास तसेच ५००० रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र स्वरूपाचा आहे.
वाजेवरील कारवाई जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, वनपाल झांझरे, गिहे तसेच वनरक्षक मुरूडकर, गायकवाड, कंधारकर, तांबारे यांनी पार पाडली असून पुढील तपास लिमकर हे करत आहेत.
03869
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.