पुणे

डिंभे धरणात २४ टक्केच पाणीसाठा

CD

फुलवडे, ता. १३ : डिंभे (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात रविवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता ३.०१७ टीएमसी म्हणजेच २४.१५ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. धरणाच्या डावा कालव्यातून ६०० व उजवा कालव्यातून २०० असा एकूण ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यंदा धरण २८ सप्टेंबरला १०० टक्के भरले होते. परंतु सध्या धरणात फक्त २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठ्यात सहा टक्क्यांनी घट दिसून येत आहे. धरणातील पाणी मे, जून महिन्यापर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. डोंगर माथ्यावरील गावे व वाड्यावस्त्या तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक पाणवठे आटल्याने माणसांबरोबरच पशुपक्षी व जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळे, विहिरी, पाणवठ्यांत जेमतेम शिल्लक असणारे पाणी दूषित झाले असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
‘हर घर जल, हर घर नल’ योजनेअंतर्गत काही गावांमध्ये पाण्यासाठी पाइपलाइन टाकल्या आहेत. तरी काही गावांमध्ये पाइपलाइनचे काम संथ गतीने सुरू आहे. परंतु, धरणातच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार? असा प्रश्न आदिवासी बांधवांनी केला आहे.

03892

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT