पुणे

आहुपे, पाटण खोऱ्यात भात पेरणीची लगबग

CD

फुलवडे ता. ७ : आहुपे, पाटण व भीमाशंकर या खोऱ्यांमध्ये विविध वाणाच्या भात पेरणीची लगबग सुरू आहे. येथे जवळपास ५२०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते.
शेतकरी परंपरागत भाताच्या वाणांसह रायभोग, आंबेमोहर, खडक्या, जिर यांसह अन्य वाणांची बियाणे वापरत असून बहुतांशी शेतकरी अधिक उत्पादन देणाऱ्या इंद्रायणीच्या वाणाची जास्त करून निवड करताना दिसत आहे. भाताबरोबरच नाचणी, वरई, सावा खुरसणी आदी पिकांची थोडाफार प्रमाणात पेरणी केली जाते.
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. भाताची रोप तयार करण्यासाठी बहुतांशी शेतकरी जमिनी भाजून (राब) त्यावर साळीची पेरणी करतात तर काही शेतकरी शेतात शेणखत व सेंद्रिय खतांचा वापर करून त्यावर पेरणी करतात.
भाताची लागवड करण्यासाठी तयार होत असलेली रोपे निरोगी व जोमदार आल्यास तसेच वेळेवर लागवडी झाल्यास भाताच्या पिकापासून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी भातरोपे तयार होण्यासाठी पेरणीनंतर सरासरी २१ ते ३० दिवसांचा कालावधी लागत असून पावसाने पुन्हा भात लागवडीच्या वेळी दमदार हजेरी लावल्यास वेळेत लागवडी होतील, असे जांभोरीचे पोलिस पाटील नवनाथ केंगले, दत्तात्रेय केंगले, दिगंबर केंगले, युवानेते मारुती दादा केंगले यांनी सांगितले.

गेली महिनाभर पाऊस झाल्याने शेतात बुरशीजन्य रोगांचा प्रसार जलद होऊ शकतो. त्याकरिता शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
- रामचंद्र बारवे, कृषी मंडळ अधिकारी, डिंभे ता. आंबेगाव.
04045

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Cancer Symptoms : खळबळजनक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांमध्ये आढळली 'कॅन्सर'सारखी लक्षणे

कपिल शर्माही खलिस्तानींच्या निशाण्यावर; दोन दिवसांपूर्वी उघडलेल्या कॅफेवर गोळीबार, 'या' संघटनेने घेतली जबाबदारी

Latest Maharashtra News Updates : नाशिकच्या गोदावरी नदीत एक जण गेला वाहून

Video: आई शप्पथsssss असं रिपोर्टिंग तुम्ही पाहिलं नसेल! गुरुग्राममध्ये पावसाचा कहर, त्यात या पठ्ठ्याला आली लहर मग...

Thane News: सफाई कर्मचाऱ्यांना नवी ओळख देण्याचा निर्धार, गणवेश बदलण्याचा निर्णय, पालिकेची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT