पुणे

फुलवडे येथील आश्रमशाळेत गुरू तेग बहादूर यांना अभिवादन

CD

फुलवडे, ता. १८ ः फुलवडे (ता. आंबेगाव) येथील श्री नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित आश्रमशाळेत बुधवारी (ता. १८) शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्री गुरू तेग बहादूर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातून त्यांची प्रतिमा हातात धरून विद्यार्थ्यांनी ‘हिंद दी चादर अमर रहे, श्री गुरू तेग बहादूर अमर रहे, मानवता धर्म अमर रहे अशा घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी माध्यमिकचे मुख्याध्यापक सुनील पोटे, प्राथमिकचे मुख्याध्यापक सोपान फटांगरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याविषयी बोलताना सचिन बटवाल म्हणाले, ‘‘त्यांचे बलिदान इतिहासात अमर झाले व भारतभूमीचे कवच म्हणून त्यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाते. सत्य व अहिंसेचे प्रेषित असलेल्या तेग बहादूरांनी बलिदान देऊन मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला.’’
खंडू कारंडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन सचिन बटवाल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT