पुणे

पिंपळवंडी येथे बिबट्याचे दर्शन

CD

पिंपळवंडी, ता.१३ : पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथे सोमवारी (ता.१३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गावच्या वेशिजवळील वर्दळीचा असणारा रस्ता संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पार करत बाजूलाच असणाऱ्या शेतात बिबट्या गेला असल्याचे नागरिकांनी पाहिले.
दरम्यान वनविभागाला याबाबत कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचाऱ्यांना बिबट्याचे ठसे शेतात आढळून आले. आज मतदानाचा दिवस असल्याने गावात गर्दी आहे.
काळवाडी, पिंपरी पेंढार ,पिंपळवंडी या ठिकाणी बिबट्याने मानवावर हल्ले करून त्यांना जखमी व ठार केलेले आहे.त्यामुळे दिवसा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील सदर रस्त्यावरून रात्रीच्या वेळी बिबट्या जाताना नागरिकांनी अनेकदा पाहिला आहे. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
02038

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT