पुणे

पाटसला रानगव्याच्या दर्शनाने खळबळ

CD

पाटस, ता. ११ : सध्या शेताशिवारात बिबट्याचे सावट असताना आता आणखी एका दुर्मीळ प्राण्याची भर पडली आहे. पाटस (ता. दौंड) येथे शिंदेवस्ती भागात रानगवा दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा रानगवा रात्रीच्यावेळी उसातून बाहेर येऊन फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दौंड तालुक्यात उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे वन्यजीवांना लपून राहणे सोपे झाले आहे. परिणामी, बिबट व इतर प्राण्यांचा अधिवास वाढला आहे. मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील दौंड, हिंगणीगाडा भागात रानगव्यांचे दर्शन झाले आहे. यंदाही याची री ओढली गेल्याचे चित्र निर्माण झाले. दोन दिवसांपासून पाटस परिसरात म्हशीच्या आकाराचा एक प्राणी शेताशिवारात फिरत असल्याचे काही लोकांच्या नजरेस आले. मात्र, ही कोणाची तरी म्हैस असेल अशा भ्रमात नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महामार्गाकडेच्या शिंदेवस्ती भागात रात्री अचानक उजेडात येताच हा रानगवा असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. मात्र, लोकांना पाहून तो उसाच्या शेतात पसार झाला.

याबाबत वन विभागाला माहिती मिळताच वन परिमंडल अधिकारी शीतल खेंडके, वनरक्षक पद्मिनी कांबळे, बाबासाहेब कोकरे, रमेश कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी राजू शिंदे यांनी कांद्यात फिरलेल्या प्राण्याचे ठसे दाखविले. त्यावेळी हा कोणता प्राणी आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला. शुक्रवारी रात्री उसात बसलेल्या रानगव्याने पुन्हा परिसरातील लोकांना दर्शन दिले. या वेळी एकाने रानगव्याची मोबाईलवर छबी टिपल्याने हा रानगवा असल्याचे दिसून आले.

याबाबत तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे म्हणाल्या, गवा हा लाजाळू व घाबरट प्राणी आहे. माणसाची चाहूल लागताच तो पळ काढतो. मात्र, त्याचा पाठलाग केल्यास तो आक्रमक होतो. नागरिकांनी त्याला त्रास होईल, असे कृत्य करू नये. तसेच तो परत दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT