पुणे

स्पर्धा परीक्षांसाठी ग्राम अभ्यासिका

CD

पुणे, ता. २३ : जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिकांच्या इमारती बांधून पूर्ण केलेल्या आहेत. यापैकी काही अभ्यासिका या तात्पुरत्या स्वरूपात सुरूही केल्या आहेत. मात्र, या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांना या अभ्यासिकांचा अधिकाधिक वापर करता यावा, या उद्देशाने या सर्व अभ्यासिका आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवक-युवतींसाठी खुल्या करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील युवक-युवतींचा स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढविणे, हा यामागचा उद्देश आहे.
या ग्राम अभ्यासिकांमध्ये मागासवर्गीय युवक व युवतींना नाममात्र दराने प्रवेश दिला जाणार आहे. नियंत्रण व देखरेखीसाठी जिल्हा, तालुका पातळीवर संनियंत्रण समित्या; तर गावपातळीवर युवक कार्यकारी समित्यांची स्थापना करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (ता. २३) दिला आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या प्रवर्गातील युवक-युवतींना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहेत.

अशी असणार समिती
जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती ही सामाजिक न्याय विभागाची विषय समिती असणार आहे. तालुका संनियंत्रण समितीचे अध्यक्ष हे संबंधित पंचायत समितीचे सभापती असणार आहेत. संबंधित गावातील युवकांमधून युवा कार्यकारी समिती निवडली जाणार आहेत. या युवा कार्यकारी समितीच्या माध्यमातून अभ्याससत्र, चर्चासत्राचे नियोजन, संवाद कार्यक्रम, सराव परीक्षा, सहभाग वाढविणे आणि कार्यशाळांचे आयोजन करणे आदींसाठी प्रत्येकी एका सदस्याची युवकांमधून निवड केली जाणार आहे. शिवाय गावचे सरपंच हे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. याशिवाय या समितीत स्थानिक पातळीवरील तज्ज्ञ प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, जमाती व महिला प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश केला जाणार आहे.

अभ्यासिका प्रवेशासाठीची पात्रता व निकष
- इच्छुक विद्यार्थी संबंधित तालुक्यातील असणे आवश्‍यक
- विद्यार्थ्याचे वय हे १८ ते ४३ दरम्यान असावे
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश
- खुल्या गटातील विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र
- मागासवर्गीय विद्यार्थ्याने जातीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य
- प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी किमान १२ वी उत्तीर्ण असावा
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १२०० रुपये शुल्क भरावे लागणार
- खुल्या गटातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २४०० रुपये शुल्क भरावे लागणार
- प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये अनामत रक्कम घेणार

ग्रामपंचायतींकडून वर्गणी घेणार
या अभ्यासिकांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आणि देखभालीसाठी आवश्‍यक कर्मचारी मानधन तत्त्वावर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातूनही निधी जमा केला जाणार आहे. यानुसार ग्रामपंचायतींकडून वार्षिक वर्गणी घेतली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तीन गटात विभागणी केली आहे. पाच हजारांपुढील लोकसंख्या असलेल्या, अडीच हजार ते पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या आणि अडीच हजारांच्या आत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती, असे ते तीन गट आहेत. या ग्रामपंचायतींकडून अनुक्रमे प्रत्येकी चार, दोन आणि एक हजार रुपयांची वर्गणी घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT