पुणे

सिद्धेश्‍वर येथील वणव्यात आंब्याची ८० झाडे खाक

CD

पिरंगुट, ता. २२ : सिद्धेश्‍वर-वेडे (ता. मुळशी) येथे अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्यात हापूस आंब्याच्या ७० ते ८० झाडांसह नारळ व चिकूचीही झाडे खाक झाली.
सिद्धेश्‍वर-वेडे येथील प्रगतशील शेतकरी नथू लक्ष्मण मारणे यांनी आपल्या सहा एकर डोंगरावर हापूस आंबा, नारळ व चिकू या झाडांची बाग फुलवली आहे. त्यासाठी थेट कोकणातून रोपे आणली आहेत. गेल्या २५ वर्षांपासून त्यांनी कष्टाने ही बाग जोपासली आहे. मात्र, शनिवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या बागेच्या मागील भागात असलेल्या डोंगराला अज्ञात व्यक्तीने वणवा लावला. त्याची आग मारणे यांच्या बागेमध्ये आली.
दरम्यान, बागेला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर नथू मारणे यांनी तातडीने धाव घेतली. गावातील राहुल अंकुश मारणे व त्यांच्या कामगारांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निम्म्या बागेचे संरक्षण झाले. मात्र, हापूस आंब्याच्या ७० ते ८० झाडांसह नारळ व चिकूचीही झाडे खाक झाली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, या नुकसानीचा पंचनामा करण्याची व भरपाई देण्याची मागणी नथू मारणे यांनी केली. तसेच, वणवा लावणाऱ्या संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

सिद्धेश्‍वर-वेडे (ता. मुळशी) : वणव्याच्या आगीत शेतकरी नथू लक्ष्मण मारणे यांची खाक झालेली झाडे.
PNE23T44472

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT