पुणे

शिक्षकांच्या बदल्यांचा कारभार लिपिकांच्या हातात?

CD

पिंपरी, ता. २७ ः आमच्या बदल्‍यांबाबत परिपत्रकाद्वारे माहिती मागवली आहे. मात्र प्राथमिक शिक्षण विभागातील काही लिपिक मर्यादित वेळेत कामकाज करत नसल्याने वर्षानुवर्षे आम्हाला शिक्षण विभागाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्‍याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेतील प्राथमिक शिक्षक, उपशिक्षक, पदवीधर, मुख्‍याध्यापक यांच्या बदल्यांविषयी सर्वंकष धोरण निश्‍चित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार बदल्यांबाबत पहिले परिपत्रक १३ फेब्रुवारीला २०२२ रोजी काढले होते. त्यामध्ये वैयक्तिक किंवा वैद्यकीय कारणास्तव बदलीबाबतचे अर्ज देण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेकांनी विभागीय पर्यवेक्षकां मार्फत शिक्षण प्राथमिक विभागाकडे आवश्‍यक त्या कागदपत्रांसह दिली आहे. याला आता एक वर्ष उलटून गेले आहे, तरीही त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आता प्राथमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी ९ मार्च २०२३ पुन्हा परिपत्रक काढून नव्याने अर्ज करण्यास सांगितले आहे.

शिक्षण विभागात १५ टेबल आहेत. त्यापैकी दोन टेबलांवर बदल्यांची कामे आहेत. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार या टेबलवरील लिपिक वर्ग योग्य कालावधीत कामकाज करत नाही. १५ दिवस, महिनाभर रजेवर असतात. रजेवर गेल्यावर संबंधित कालावधीत कामकाज कोण करणार? त्याविषयी स्पष्टता नसते. त्यावर कार्यवाही होत नाही. माहिती घेण्यास गेल्यावर ते रजेवर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे वर्ष वर्ष हेलपाटे मारून वैताग आला आहे. एक शिक्षक म्हणाले, ‘‘मी स्वतः कामगार कल्याण विभागाकडे कर्मचारी तक्रार निवारण दिनापासून दोनवेळा अर्ज केला आहे. तरीही निवारण झालेले नाही.’’

कोट
‘‘दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधीची सुट्टी असेल, तर तात्पुरती जबाबदारी इतर लिपिकाकडे दिली जाते. अनेक लिपिक निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त होते. त्यामुळे कामे प्रलंबित राहिली आहेत. अपुरे कर्मचारी असल्यामुळे शिक्षक आणि नागरिक त्रस्त आहेत. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे.’’
-संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT